Thursday, 28 March 2013

संपूर्ण परिवर्तनासाठी जनतंत्र यात्रा


31 मार्च ते 18 एप्रिल 2013 दरम्यान पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमध्ये...
संपूर्ण परिवर्तनासाठी जनतंत्र यात्रा
जनतंत्र मोर्चाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणे...

उदा. भ्रष्टाचार मुक्त भारत निर्मितीसाठी जनलोकपाल, राईट टू रिजेक्ट, ग्रामसभेला पूर्ण अधिकार मिळणे, दप्तर दिरंगाई (एका टेबलावरील पेपर दुसर्या टेबलवर सात दिवसात जाणे) नागरिकांची सनद, राईट टू रिकॉल, या मुद्यांवर जनशक्तीचा दबाव निर्माण करून सरकारने सशक्त कायदे करण्यास भाग पाडणे कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणेसाठी संघटीतपणे सरकारवर दबाव निर्माण करणे,स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षांनंतर सुध्दा ‘‘माल खाये मदारी और नाच करे बंदर’’अशी शेतकर्यांची अवस्था आहे, त्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करी
आहेत. शेतकर्यांचे अनेक प्रश्र्न आहेत ते सोडिवण्याचा प्रयत्न करणे, मजुरांचे असंख्य प्रश्र्न आहेत,कंपन्या आणि सरकराचे साटेलोटे असल्याने मजुरांचे कोणीही ऐकत नाही, आज काही कारखानदार कारखान्याचे प्रॉडक्शन वाढविण्यासाठी मजुरांचे शोषण करीत आहेत, मंजूर काही बोलला तर त्यांना काढून टाकले जाते,अशा मजुरांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणे, आज संसदेमध्ये घटनेचे पालन होत नाही. जो वंचित आहे, दलित आदिवासी धुमंतू, मछूआरे, मागास वर्ग, मुसलमान यांचे जीवन चांगले करण्याऐवजी विदेशी कंपन्यांचा विचार अधिक होत आहे.
काही शिक्षण महर्षी म्हणवून घेणार्यांनी अनेक शिक्षण संस्था काढून शिक्षणाचे बाजारीकरण चालवलेआहे. सामान्य माणसांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाले आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतायेत नसल्यामुळे सामाजिक आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आहे. आज शिक्षणपध्दतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे, निसर्गाचे शोषण वाढत चालल्यामुळे कालांतराने पृथ्वीचे काय होणार? या चिंतेने जगातील जाणकरांना ग्रासले आहे, तापमान (उष्णता) वाढत चालले आहे, त्यामुळे नैसर्गीक वातावरणात बदल होत आहेत, त्यासाठी पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी सशक्त कायदे करण्यास सरकारला भाग पाडणे हे जनतंत्र मोर्चाचे कार्य असेल.
सरकारकडूनमोठया प्रमाणावर विदेशी कंपन्यांना आमच्या देशात बोलावून त्यांना कारखान्यासाठी जमीन देण्यासाठी जबरदस्तीने शेतकर्यांची जमीन घेतली जात आहे. शेतकर्यांनी जमीन दिली नाही तर शेतकर्यांवर डंडे चालविलेजातात. डंड्यानेकाम नाही झाले तर गोळयाही चालिवल्या जाऊन शेकर्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेतआणि विदेशी कंपन्यांना दिल्या जात आहेत, त्यामुळे आमच्या देशातील हवा, पाणी, जमिनीचे दुषितीकरण वाढत चालले आहे, हीदेशाची हानी कधीही भरून निघणारी आहे. म्हणूनजनतंत्र मोर्चा शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील.
अशा प्रकारचे असंख्य प्रश्र्न आहेत कि जनतेवर अन्याय अत्त्याचार करणारे निर्णय सरकारकडून होतात. वास्तविक पहाता 26 जानेवारी 1950 साली आम्ही देशात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्या दिवशी देशात प्रजेची सत्ता आलेली आहे. सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे.सर्व जनता या तिजोरीचे नियोजन करू शकणार नाही म्हणून आम्ही जनतेने प्रातिनिधीक लोकशाहीचा स्वीकार करून राज्यासाठी (विधानसभा) आमदारसाहेब केंद्रासाठी (लोकसभा) खासदार साहेबांना आपले सेवक म्हणून पाठविले आहे.
जनतेनेविधानसभेमध्ये पाठविलेले आमदारसाहेब आणिलोकसभेमध्ये पाठविलेले खासदारसाहेब यांनी जनतेच्या तिजोरीचे योग्य प्रकारे नियोजन करणे आणि आपला देश कायद्याच्या आधाराने चाललेला देश असलेने त्यांनी जनहिताचे, राष्ट्रहिताचे सशक्त कायदे करायचे आहेत. अशा हेतूने जनतेने त्यांना पाठविले आहे. मात्र विधानसभा आणि लाेकसभा कायदे करणार्या सभा असूनही आज सशक्त कायदे होत नाही? ही दुर्देवी बाब आहे.
जनलोकपाल कायद्यासाठी दि.16 ऑगस्ट 2011 रोजी करोडो लोक रस्त्यावर आले.सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेने देशभर आंदोलने केली. जनलोकपालाच्या काही मुद्यासंबंधाने पंतप्रधानांनी आश्र्वासन देऊनसुध्दा दोन वर्षे झाली मात्र कायदे केले नाहीत. दिलेल्या आश्र्वासनाचे पालन केले नाही. पंतप्रधान जनतेला दिलेले लेखी आश्र्वासन पाळीत नसतील तर जनतेने जायचे कोणाकडे? प्रश्र्न आहे. लोकसभेसहसंसदेमध्ये सर्व संमतीने भ्रष्टाचाराला आळा घालणारे जनलोकपालाचे काही मुद्दे पास होऊनही अंमलबजावणी होत नसेल तर तो संविधान आणि संसदेचा अवमान आहे असे म्हटलेतर वावगे होणार नाही. कारण सरकारची भ्रष्टाचाराला आळा घालण्याची इच्छा नाही.
आताएकच मार्ग दिसतो आहे कि राष्ट्रीय स्तरावर जनतेचे संघटन करून स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार लावून जे सरकार मनमर्जी प्रमाणे चालले आहे. अशा सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण करणे.त्यासाठी लाखो लोकांना पुन्हा एकदा अहिंसा मार्गाने जेल भरो आंदोलन कि कोणत्याही जेलमध्ये जागा शिल्लक नाही असे आंदोलन करावे लागेल. त्याचप्रमाणे देशभर संघटन उभे झाले तर विधानसभा आणि लोकसभेच्या पवित्र मंदिरामध्ये चारित्रशिल उमेदवारालाच मतदारांनी आपले मत देऊन पाठविणे या संबंधाने लोकशिक्षण, लोकजागृती करून जन संघटन करणे सोपे होईल. त्यासाठी जनतंत्र मोर्चा देशभर दौरे करून जनतेला जागविण्याचे काम करून संघटन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
जनतेने विधानसभा आणि लोकसभेमध्ये चारित्रशिल माणसं पाठविली तरच होऊ शकेल राष्ट्रीय स्थरावर सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन असणार्या जनतेचे संघटन झाले तरच संपूर्ण परिवर्तन करण्यासाठी सशक्त कायदे करणे सोपे होईल.जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. देशात संपूर्ण परिवर्तन व्हावे असे जनतेला वाटत असेल,भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण व्हावा असे वाटत असेल तर मतदारांनी पक्ष आणि पाटर्याकडे पाहाता जनतेने एकत्र येऊन चारित्र्यशिल उमेदवार निवडावा. आपापसात मतभेद होऊ देता सर्वानी मिळून त्यांना निवडून पाठवावे. जोपयर्र्ंत विधानसभा अाणि लोकसभेमध्ये चारित्र्यशिल माणसेजाणार नाहीत तो पर्यंत देशात संपूर्ण परिवर्तन घडणार नाही. भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही, जनतेला न्याय मिळणार नाही. आजची राजकिय परिस्थिती पहाता पक्षीय राजकारणातून समाज आणि देशाला उज्वल भविष्य मिळेल अशी अशा राहिलेली नाही. कारण अधिकांश पक्ष आणि पाटर्या सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता या भोवती फिरतांना दिसत आहेत. पक्ष, पाटर्यांसमोर सामाजिक, राष्ट्रीय दृष्टाकोन राहिला नाही. त्यासाठी निवृत्त जनरल व्हि.के.सिंह आणि आम्ही राष्ट्रीय स्थरावर जनतंत्र मोर्चाची स्थापना केली आहे आणि लोकशिक्षणातून लोकजागृत्ती करून लोक संघटन करण्याच्या उदेशाने जनतंत्र मोर्चाच्या माध्यामातून ‘‘जनतंत्र यात्रा’’या नावाने लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी देशभर दिड वर्षे सतत फिरण्याचे ठरविले असून त्या यात्रेची सुरवात अमृतसर मधील शहीद भूमी जलियांवालाबाग पासून दि.31 मार्च 13 रोजीकरण्याचे ठरविले आहे.पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमधून दि.17 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालणार असून एकूण पस्तीस (35) मोठया सभा घेऊन लहान लहान अनेक सभा होणार आहेत.राष्ट्रीय स्थरावर जनसंघटन उभे करण्याचा प्रयत्न होणार आहे. पहिल्या तीन राज्यातील हा दौरा संपल्यानंतर इतर राज्यांमध्येही दौरे काढले जाणार आहेत.
जनतंत्र मोर्चा कोणतीही निवडणूक लढविणार नाही, कोणत्याही पक्ष आणि पार्टीला पाठींबा देणार नाही, देशात संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जनतेवर होणार्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणे अशी भूमिका रहाणार आहे. जनतंत्र मोर्चाचा कार्यकर्ता कोणाकडूनही पसेे घेणार नाही. पोष्टर, फोल्डर, बॅनरसारख्या वस्तुंच्या रूपाने देणगी घेऊ शकेल. मात्र स्वतः कोणाकडूनही पैसेघेणार नाही. जनतंत्र मोर्चाचे गांव, तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर प्रत्येक राज्यात संघटन उभे होईल मात्र कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव अशी पदे धारण करणार नाही. तर देशहितासाठी, समाजहितासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करतील.
1942 साली ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाव आणि देश वासियांना करेंगे या मरेंगेहाक दिली होती.त्यावेळी कोणतीही पदे नव्हती मात्र (व्हाॅलिंटीयर) स्वयंसेवक म्हणून स्वातंत्र्यासाठी प्रत्येकजण ररत्यावर उतरला होता. त्यामुळे इंग्रजांना जावेलागलेव आम्हा भारतीयाना स्वातंत्र्य मिळाले. 65 वर्षांनंतरही खरे स्वातंत्र्य आजहीजनतेला मिळालेलेनाही. फक्त गोरे गेले आणि काळे आले. तोच भ्रष्टाचार तीच हुकूमशाही, तीच लुट गुंडगिरी दहशतवाद म्हणून स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजून प्रत्येक युवक कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याची गरज आहे. वेळ आली तर मार खाण्याची तयारी किंवा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी लागेल. देशातील कोणत्याही जलेमध्ये जागा नाही अशा प्रकारे जेलभरो झाले,तरच देशामध्ये परिवर्तन घडून येऊ शकेल. गरीब माणसांना दिलासा मिळू शकेल. 31 मार्च 2013 पासून सुरू होणार्या यात्रेमध्ये येणार्या कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येते कि आपल्या खर्चाने आपल्या वाहनाने येणार्या कार्यकर्त्यांनीच या यात्रेत सहभागी व्हावे.
कारण जनतंत्र मोर्चा किंवा अण्णा हजारे यांचे कडे पैसेे नसल्याने आम्ही आर्थिक सहकार्य करू शकत नाहीत या बद्दल क्षमस्व। मला विश्र्वास वाटतो कि दिड वर्षे सर्व देशभर हीयात्रा झाली तर लाख नव्हे करोडोच्या संखेत जनता संघटित होऊ शकेल. अशा प्रकारचे संघटन उभे झाले तर स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार लावणार्या सरकारांना जनता धडा शिकवू शकेल. देशातील विधानसभा, लोकसभेमध्ये जाणार्या गुंड, भ्रष्टाचारी, लुटारू,व्यभिचारी लोकांना या पवित्र मंदिरामध्ये जाण्यापासून रोख
ता येऊ शकेल आणि चारित्र्यशिल लोकांना या पवित्र मंदीरामध्ये पाठविता येऊ शकेल. त्यासाठी निवडणूकीच्या वेळी प्रत्येक मतदाराने भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करावी लागेल की मीकोणत्याही अमिषाला बळी पडता फक्त चारित्र्यशिल उमेदवारालच माझे मत देईल. अस झालं तरच वेगवेगळे कायदे करणे सोपे होऊन देशात संपूर्ण परिवर्तनाचे कायदे करता येतील. देशातील जनतेला आता आपण खर्या अर्थाने स्वातंत्र्यात आहोत असा अनुभव घेता येईल. आज देशात फक्त 50% मतदान होते त्यामध्ये फक्त 20 ते 22 % मतावर निवडून आलेले लोक राज्यकरीत आहेत. लोकजागृती करून 85% ते 90% मतदान कसेहोईल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोबत सुरू होणार्या यात्रेचा कार्यक्रम दिला असून पुढील यात्रेचा राज्यवार तपशिल आम्ही जाहीर करीत राहू।
‘‘भारत माता की जय ’’
धन्यवाद।



स्थळ - राळेगणसिद्धी,                                          (किबा. तथा अण्णा हजारे)
दि. 28 मार्च 2013.                                             
                                                          

(जनतंत्र यात्रेचा कार्यक्रम सोबत जोडला आहे.)


No comments:

Post a Comment