Monday 4 February 2013

पक्ष आणि पाटर्याकडून देशाला उज्वल भविष्य नाही...


‘‘ जागरूक मतदारच देश बदलू शकेल,
त्यासाठी युवकांनी पुढे येणे काळाची गरज’’

पक्ष आणि पाटर्याकडून देशाला उज्वल भविष्य मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

पक्ष आणि पाटर्यामध्ये सर्वच लोक वाईट आहेत असे म्हणता येणार नाही, मात्र पक्ष आणि पार्टी मध्ये राहून देश बदलू शकतील असे वाटत नाही. कारण आज देशापेक्षा पक्षाचे महत्व वाढले आहे आणि पक्षापेक्षा व्यक्तिचे महत्व वाढले आहे. देशातील पक्ष आणि पाटर्यामध्ये व्यक्तिचे महत्व वाढल्यामुळे घराणेशाही वाढीला लागली आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना निवडून आणले जाते आणि त्यांच्यात कार्यक्षमता नसतांना देशाची महत्वाची जबाबदारी दिली जाते. यातून समाज आणि देशाची फार मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्ष-पाटर्यामुळे सत्ता आणि पैशांच्या स्पर्धा सुर झालेल्या आहेत. सत्तेमध्ये येण्यासाठी उमेदवांराच्या चारित्र्याकडे न पहाता त्यांच्या मागे मतांचा गठ्ठा किती आहे इकडे पाहीले जाते.
काही पक्ष आणि पाटर्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे कि, आपल्या पार्टीला निवडणूकीसाठी जो पैसा लागतो, त्यासाठी पक्ष पार्टीला जी देणगी मिळते, त्या देणगीपैकी वीस (20) हजार रूपयापर्यंतच्या देणग्यांचा हिशेब कोणालाही द्यायचा नाही. आज अनेक पक्ष आणि पाटर्या काही उद्योगपती कडून करोडो रूपये देणगी घेतात. त्यांचे वीस (20) हजार रूपयांचे तुकडे करतात त्या प्रत्येक तुकडयाला बोगस नांवे देतात आणि काळा पैसा येथूनच पांढरा व्हायला सुरूवात होते. विदेशातील काळा पैसा परत आणावा यासाठी अनेकांचा प्रयत्न चालू आहे. मात्र आमच्या देशातील काळा पैसा इथे पांढरा होतो. हा गंभीर धोका आहे. आपण देशातील जनतेने जनलोकपाल कायद्याप्रमाणे आग्रह धरायला हवा की पक्ष-पाटर्यांचा देणगीचा पैसा सरकार जमा करा आणि निवडणूकीचा खर्च सरकारनेच करावा. त्याच प्रमाणे सर्व पक्ष पाटर्यांच्या डोनेशनच्या पैशांचे स्पेशल ऑडीट करा म्हणजे काळा पैसा कोठून आला हे जाहीर होईल.
अशी ही उदाहरणे आहेत की, भ्रष्टाचारी म्हणून एका पक्षाने आपल्या पक्षातून काढून टाकले आणि दुसर्‍या पक्षाने त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. काही पक्ष आणि पाटर्यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय दृष्टीकोन राहीलेला नाही. स्वातंत्र्यासाठी झालेल्या  लाखो लोकांच्या बलिदानची आठवण राहिलेली नाही. सेवाभाव राहिलेला नाही. सत्ता आणि पैशांच्या स्पर्धेमुळे काही पक्ष आणि पाटर्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. हा या देशाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आज लोकसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदीरामध्ये ज्या मंदीरामधून देशाची जडण घडण करावयाची आहे. अशा पवित्र मंदिरामध्ये एकशे त्रेसष्ठ (163) सांसद ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माणसे संसदेमध्ये बसलेले आहेत. याला पक्ष आणि पाटर्या जबाबदार आहेत.  तिकीट देतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना तिकीट देणे हा दोष आहे. त्याच बरोबर काही मतदार ही जबाबदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण बरेच मतदार लाच घेऊन आपले अमूल्य मत देतात, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक विधासभा आणि लोकसभा मध्ये जातात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेचे पालन करून घटनेची अंमलबजावणी करणारी हि मंदीरे आहेत. अशा या पवित्र मंदीरामध्ये गुन्हेगार शिरू लागले तर काय होणार लोकशाहीचे? प्र्रश्नच आहे.
पक्ष आणि पाटर्यांच्या सत्ता आणि पैशांच्या स्पर्धा मंत्रालयापासून गांवस्तरापर्यंत सुरू झालेल्या असल्यामुळे विकास कामांचे श्रेय आपल्याच पक्षाला मिळावे असे बर्‍याच पक्ष आणि पाटर्यांना वाटत असल्यामुळे मंत्रालयापासून गांवस्तरापर्यंत गटबाजीला उधान आले आहे. गांवस्तरावर प्रत्येक गांवात गटबाजी निर्माण झालेली आहे.
अशा गटबाजीमुळे विकास कामांना खिळ बसत चालली आहे त्याचप्रमाणे विकासकामांमधील भ्रष्टाचारही वाढत चालला आहे. लोकशाही मध्ये जनतेने जनतेसाठी, जन सहभागातून चालवलेली शाही ती लोकशाही. मात्र पक्ष आणि पाटर्यांच्या स्पर्धेमध्ये लोकशाही पायदळी तुडविली जात असून पुढारीशाही आणि अधिकारी शाहीला महत्व आले आहे.
26 जानेवारी 1950 साली  जनता या देशाची मालक झालेली असून सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. मात्र पक्ष आणि पाटर्यांनी जनतेचे हक्क हिरावून घेतले आहेत व मालक असलेल्या जनतेला सेवक केले आहे व जे सेवक ते मालक झाले आहे. सरकारच्या कामात लोकांचा सहभाग असावा असे सांगीतले जाते. ही बाब योग्य नाही. जनता मालक आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी जनतेचे सेवक आहेत. म्हणून जनतेच्या कामात सरकारचा सहभाग असायला हवा. अनेक खेडयात दोन-तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संपूर्ण गांव वेठीला धरले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत, एखादेवेळी गांवात कुणीतरी धाडस करतो आणि पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करायला जातो. मंत्रालयातून फोन येतो की तो आमचा माणूस आहे काही करू नका. खेडयापाडयांतील दहशदवाद हा पाकिस्तानच्या दहशदवादाप्रमाणेच घातक आहे. खेडयातील अशा दहशतीमुळे महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील भारताचे खेडयांकडे चलाहे स्वप्न पुरे होऊच शकणार नाही.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरूच्या बलिदानाची आठवण ठेवणार्‍या युवकांनी मनात आणलं तर ते देश बदलू शकतील असा पूर्ण विश्र्वास वाटतो. त्यासाठी तरूणांनी एकत्र येऊन आपला चारित्रशिल उमेदवार आपण निवडावा. तो कोणत्याही पक्ष आणि पाटर्यांचा नको. फक्त चारित्र्यशिल असावा. तो सत्ताधार्‍यात बसू द्या अथवा विरोधकात बसू द्या.
चारित्र्यशिल उमेदवार संसदेमध्ये गेले तरच जनलोकपाल, राईट टू रिजेक्ट, दप्तर दिरंगाई जनतेची सनद, ग्रामसभेला जादा अधिकार या सारखे सशक्त कायदे होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल. शेतकर्‍यांचे प्रश्र्न, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार, कामगारांचे प्रश्र्न सर्व प्रश्र्न सुट शकतील. जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. तरूणांनी खेडयापाडयातील मतदारांना जागवा. आज फक्त पन्नास टक्के 50% मतदान होते. युवकांनी जनतेला (लोकांना) जागवून पंचाऐंशी 85 टक्के मतदान झाले तरच त्यातून हा देश बदलेल. जनतेला न्याय मिळेल आणि विधानसभा, लोकसभेमध्ये जाणार्‍या गुंड, भ्रष्ट, व्यभिचारी, प्रवृत्तीच्या लोकांना रोखता येऊ शकेल.
     देशामध्ये बदल घडून आणावा असे वाटत असेल तर लोकसभा निवडणूकीपर्यंत आता एक एक दिवस महत्वाचा आहे, तो वाया न घालविता लोकशिक्षण, लोकजागृतीला सुरवात करा, त्याच बरोबर जागृत जनतेचे संघटन करा. जेव्हढे चारित्रशिल युवकांचे संघटन होईल तेव्हढे यश तुमच्या हाती आहे.
     मी दिड वर्षे सर्व देशभर प्रवास करून जनतेला जागविणार आहे. वाढत्या भ्रष्टाचारमुळे, वाढत्या महागाई जनतेला जीवन जगणे अशक्य झाले आहे. अशा जनतेला आपण मिळून न्याय देणेचा प्रयत्न करू या.
जय हिंद!

                                           कि. बा. उर्फ अण्णा हजारे.

राळेगणसिद्धी,
4 फेब्रुवारी 2013.
संपर्क साधाएसएमएस 99 235 99 234 यावर आपला नांव, पत्ता, ईमेल व इतर माहिती भरून एसएमएस करा.

1 comment:

  1. इस जनआंदोलन को शीघ्र लोकप्रिय, देशव्यापी और कारगर बनाने के लिए एक सुझाव देना चाहता हूँ। अण्णाजी रालेगनसिद्धि से ऐलान कर दे की हमे देश के हर एक गाँव में अब एक ऐसा ‘अराजनैतिक संगठन’ खड़ा करना है, जो आनेवाले समय में उस गाँव का सामाजिक नेतृत्व करते हुए भ्रष्ट्राचार से लेकर तमाम देश के सामाजिक विकृतियोंके खिलाफ संगठित होकर आवाज़ उठायेगा। शुरुवात में हर एक गाँव के 10-11 समविचारी देशप्रेमी युवकोंने सगठित होकर यह संगठन उनके गाँव में शुरू करना है और धीरे-धीरे गाँव के हर एक नागरिक को इस संगठन से जोड़ने का कार्य करना हैं। एसे हर एक गाँव के 10-11 प्रेरीत युवकोंका नाम, पता और संपर्क क्रमांक उन्होने तुरंत रालेगनसिद्धि मे स्थित मुख्यालय में पत्र या ईमेल द्वारा भेजना हैं ताकि उनका और उनके गाँव का नाम इस आंदोलन के साथ पंजीकृत किया जा सके और उन युवकोंको/कार्यकर्ताओं को संगठन संबंधित हर एक प्रकार का मार्गदर्शन दिया जा सके। आने वाले समय में अण्णाजी स्वयं देश के उन जिलों के मुख्यालयों को पहले भेट देकर संगठन के कार्यकर्ताओं को संबोधित करेंगे, जीन जिलों के अधीन गाँवों में संगठन का विस्तार जादा हुआ हैं। कुछ समय के बाद हर एक ग्राम संगठन को मुख्यालय के दिशा-निर्देश के साथ सुचारु रूप से कार्यान्वयित करने के लिए ग्राम संगठन के सदस्य अपने में से 7 लोगोंकी समिति चुनेंगे और उनकी सूची मुख्यालय को भेज देंगे। हर एक ग्राम संगठनों को जोड़कर तहसील संगठन, तहसील संगठनों को जोड़कर जिला संगठन, जिला संगठनों को जोड़कर राज्य संगठन और राज्य संगठनों को जोड़कर देश का सबसे बड़ा ‘अराजनैतिक संगठन’ आने वाले समय में विकसित करेंगे। ग्राम, तहसील, जिला, राज्य और देश स्तर पर संगठन को कार्यान्वयित करने के लिए हर स्तर पर 7 लोगोंकी समितियाँ रहेंगी जो संबंधित स्तर के अधीन सभी ग्राम संगठनों के सदस्यों द्वारा चुनी हुई होंगी और इस संगठन का प्रमुख कार्यान्वयन अण्णाजी के नेतृत्व में संचालित इसके मुख्यालय रालेगन सिद्धि से होगा।

    इस तरह अगर संगठन को खड़ा करने का ढाँचा बनाया जाए तो ये संगठन कम समय में ऐच्छिक कामयाबी पा सकता हैं। मुझे लगता है की अण्णाजी द्वारा अगर इस तरह संगठन को खड़ा करने का शंखनादा होता है तो कम समय में भारत में नया सूर्योदय होगा जो वर्तमान के तमाम विकृतियों का सर्वनाश करने मे सक्षम होगा।

    ReplyDelete